दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच महिनाभरापासून उमेदवार तसेच कार्यकर्त्यांची घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू होती महिन्याभरापासून शिगेला पोहोचलेला प्रचार अखेर १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी थांबला दरम्यानच्या काळात विविध उमेदवारांनी पक्ष अपक्ष अश्या सर्वच उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा,आब पणाला लावून हिरहिरीने प्रचार सभा बैठका पदयात्रा विविध हतकंडे वापरले अखेर आजचा दिवस २० नोव्हेंबर २०२४ हा सर्वच उमेदवारांचे भवितव्य हे मतदान पेटीत बंद होणार असून येत्या २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे. सर्व सुजाण नागरिकांनी कोणत्याही लोभाला अमिषाला बळी न पडता आपला योग्य उमेदवार निवडून देशाचे राज्याचे भविष्य उज्वल करण्याकडे आपला महत्त्वाचा हातभार लावावा आणि जरूर सर्वांनी मतदान करावे असे आवाहन दैनिक लोकशाही मतदार च्यावतीने करण्यात येत आहे.
चला मतदान करूया..!!
देशाच्या प्रगतीला साथ देऊया...!!
