पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बरखास्त लवकरच नूतन कार्यकरणी- रामचंद्र सरवदे

 


दैनिक_लोकशाही_मतदार

 सोलापूर- पत्रकार सुरक्षा समिती वतीने  गेली आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार  समान पेन्शन योजना  पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना  राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती  खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी  यासह पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या ग्रामीण व शहरी बाबतीत पत्रकार सुरक्षा नेहमी शासन दरबारात  आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे  पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून  अनेक पत्रकारांच्या अडचणीचे निवारण झाले असून  अनेक पत्रकाराला न्याय मिळवून दिला आहे   पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार व दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद यांनी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या पंढरपूर येथील विभागीय कार्यालयात भेट घेऊन पत्रकार सुरक्षा नूतन पदाधिकारी 2025 च्या नूतन कार्यकारणी  व पदाधिकारी बाबत चर्चा करून   पत्रकार सुरक्षा समितीची महाराष्ट्र राज्य ची कार्यकारणी बरखास्त केली असून  नूतन सन  2025 ची कार्यकारणी  केली जाणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form