दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत परंतु
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना
अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे
पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे
खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक प्रश्न राज्यसरकार कडे प्रलंबित असून या प्रश्नाबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत असे साकडे
पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र मा अध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी मुख्यमंत्री यांना घातले आहे
