दैनिक_लोकशाही_मतदार
सांगोला (प्रतिनिधी)- वृत्त संकलन:- बबन चव्हाण - रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्गवरील सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील टोल नाका असून याठिकाणी वाहतुकीच्या नियमांचा धाक दाखवत, कारवाईची भीती घालून वाहतूक पोलिसांकडून महाराष्ट्र राज्यातील व परराज्यातील वाहनधारकांची 'आ'र्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा वाहनधारकांमधून होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार सांगोला येथे दर रविवारी भरतो. बाजारामध्ये येणारे जनावरे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शेतकरी व व्यापारी पशु खरेदी - विक्रीसाठी चारचाकी गाडीतून येतात.
मोठे- मोठे व्यापारी व शेतकरी उद्योग व्यवसायासाठी सांगोला आठवडा बाजारात येत असत , त्यांना अनकढाळ टोल नाक्यावरील राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली आर्थिक मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दिवसभर टोलनाक्यावर ४ ते ५ राष्ट्रीय महामार्ग पोलिस कर्मचारी व एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी असून कारवाई करत असताना, स्वतःची 'इच्छापूर्ती' करायचा कार्यक्रम सुरू असतो.
राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो खाजगी प्रवाशी वाहने, माल वाहतूकची वाहने ये - जा करत असून रात्रं-दिवस वाहनाची येथे वर्दळ असते. याचं सुवर्ण संधीचा फायदा घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावरून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावर राज्यातील व परराज्यातील वाहने तपासण्याच्या कारणावरून अडवणूक करून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैशाची वसुली केली जाते, अशी चर्चा वाहनधारकांमधून होत आहे.
प्रवासांच्या गाडीची कागदपत्रे, लायसन,पीयूसी,पर्यावरण कर व इतर कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली पैशाची मागणी केली जाते.अपूर्ण कागदपत्रे कमतरता असल्यास १००० ते ५०० रुपये पर्यंत पठाणी वसुली केली जाते. ज्या वाहनधारकाची कागदपत्रे पूर्ण स्वरूपाची असतात अशा वाहनधारकाकडून सरासरी अंदाजे २०० ते ३०० रुपये घेतल्याशिवाय वाहन सोडत नाहीत. असा धक्कादायक प्रकार ह्या अनकढाळ टोल नाक्यावर घडत आहे, परंतु बाहेरील जिल्ह्यातील पशुधन खरेदी विक्रीसाठी आलेले शेतकरी व व्यापारी यांचे असलेल्या वाहनांना कोणतेही कागदपत्राची पडताळणी न करता चिरीमिरी घेवून जनावरे घेवून जाणारे वाहन हे सोडून दिले जाते , याचं करणास्तव शेतकरी वर्गास व व्यापारी बांधवांना आर्थिक भुर्दुंड सोसावा लागतो.
टोल नाक्यालाच आपल्या वसुलीचा अड्डा बनवलेला आहे. अनेक वेळा महामार्ग पोलीस अधिकाऱ्याकडून स्थानिक रहिवासी नागरिकांना उद्धटपणाची व दमदाटी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या शिस्तीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी आपल्या धुंदीत मस्त आहेत. रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आपल्याला वरिष्ठांनी दिलेली जहागिरीच आहे असे त्या ठिकाणी नियुक्ती केलेले अधिकारी कर्मचारी समजतात. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आपण कशीही व मनमानी पद्धतीने वसुली करू शकतो अशा अविर्भात येथील कर्मचारी व अधिकारी आहेत.यांच्या जाचाला कंटाळून संबंधित सर्व वाहनधारक हे वेडी वाकडी वाट करून म्हणजे शॉर्टकट मार्गे टोलनाका टाळून इतरत्र मार्गाने जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांकडून जी दिवसाढवळ्या टोलधाड सुरू आहे. यावर वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनधारकां मधून व सांगोला तालुक्यातील जनतेमधून नाराजीचा व्यक्त होत आहे.
