सोलापूर (प्रतिनिधी)-दिनांक २६/१२/२०२५ रोजी रात्री १०:३० वा. ते दिनांक २७/१२/२०२५ रोजी दुपारी ०१:३० वा. चे दरम्यान अयुब हुसेन सय्यद (तृतीयपंथी) यांचा त्याचे सोलापूर शहरातील राहते घर नं २२६, पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गी नाला उत्तर सदर बझार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने हत्या केली होती. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि.२७/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार पोलीस अधिकारी तथा सदर बझार पो.स्टे. कडील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गंभीर स्वरूपाचा खूनाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या. तांत्रिक माहितीच्या आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा ०३ इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याचे खात्रीशीर दिसून आले.त्यानुसार दिनांक २७/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखेचे व सदर बझार पो. स्टे कडील तपास पथके तात्काळ लातूरकडे रवाना होवून नमूद आरोपींची ओळख पटविली. त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलीसांची मदत घेवून आरोपी (१) यशराज उत्तम कांबळे वय-२१ वर्षे व्यवसाय शिक्षण रा.बौध्द विहार जवळ, इंदिरा नगर लातूर (२) आफताब इसाक शेख वय-२४ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर (३) वैभव गुरूनाथ पनगुले व्यवसाय शिक्षण रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर यांना गोपनिय माहितीच्या आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकी जवळील परिसर, लातूर येथून ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांचेकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी क्रमांक २ आफताब इसाक शेख व मयत अयुब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयुब सय्यद यास भेटण्याकरीता वारंवार सोलापूर येथे येत होता. त्यावेळी आफताब शेख यास अयुब सय्यद याचेकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती होती. त्याप्रमाणे नमूद तिन्ही आरोपी मयत अयुब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचे उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याचेकडील युनिकॉर्न मोटार सायकल वरून सोलापूर येथे आले होते.त्यावेळी नमूद तिन्ही आरोपींनी मिळून अयुब सय्यद याचा त्याचे राहते घरी खून करून आयुब याचे घरातील सोन्या सारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच खून करून जातेवेळी त्या तिघांनी मयताची यामाहा स्कूटी ही मोटार सायकल चोरून घेवून गेले होते.सदरचा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील व सदर बझार पो.स्टे. कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे ०६ तासाच्या आत उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. भालचंद्र ढवळे सदर बझार पो.स्टे. हे करीत असून नमूद आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यांना न्यायालयाने दिनांक ३१/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सोलापूरातील तृतीयपंथी खुनातील आरोपी गजाआड ; गुन्हे शाखा सोलापूर शहर यांची उत्कृष्ट कामगिरी : खूनाच्या गुन्ह्यातील ०३ आरोपी ०६ तासात जेरबंद
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर

