शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी ३१ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ



दैनिक_लोकशाही_मतदार

 सोलापूर – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेचे अनु. जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ३१ मे २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ मधील शिष्यवृत्तीचे अर्ज अंतिम मुदतीपुर्वी भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत व सदरचे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणे कामी सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण नागनाथ चौगुले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेचे अनु. जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील अर्जांचे महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण  व नवीन अर्ज नोंदणी दि. २२/०९/२०२२ पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे इ. कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहू नये, म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३१ मे २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ मधील शिष्यवृत्तीचे अर्ज अंतिम मुदतीपुर्वी भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत. 9 संबंधित महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करावेत, असेही आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form