उल्हासनगरमध्ये भीम आर्मीचा जिल्हा मेळावा संपन्न



दैनिक_लोकशाही_मतदार
उल्हासनगर -(प्रतिनिधी )-भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या ठाणे जिल्ह्याचा पदनियुक्ती व कार्यकर्ता मेळावा उल्हासनगर शिकारपुरी धर्मशाळा येथे संपन्न झाला यावेळी अनेक कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदनियुक्तीची पत्रे देण्यात आली यावेळी ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते 
भीम आमी ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश कुमार पांजवणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे , कार्याध्यक्ष सुनील गायकवाड,कोयर कमिटीचे राजुभाऊ झनके बाबा रामटेके मुंबई प्रदेश अध्यक्ष अविनाश गरुड प्रसिद्ध कवि व समाज सेवक डॉ गिरीश लटके प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भिवंडीचे समाजसेवक फहब शेख यांना ठाणे जिला कार्य अध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली, मुंब्रा येथील समाजसेवक अतीक उर रहमान सिद्दिकी यांना ठाणे जिल्हा महासचिव म्हणून नियुक्तिपत्र देण्यात आले तर पत्रकार किरण तेलगोटे यांना ठाणे जिल्हा प्रवक्ता म्हणून उद्योगपती शशिकांत जगतयानी यांना ठाणे जिला उपाध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली . लबाना समाजातील हरजीत सिंह लबाना यांना ठाणे जिल्हा सचिव पद पर नियुक्तिपत्र देण्यात आले उल्हासनगर शहर अध्यक्ष म्हणून अनिल चव्हाण व महासचिव म्हणून साईं कुमावतयांची यावेळी निवड करण्यात आली ठाणे शहराचे पत्रकार शहर प्रमुख रविंद्र बागुल यांनी सूत्रसंचालन केले 
यवेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली ठाणे जिल्ह्यात भीम आर्मी संघटना वाढवितानाच भीम आर्मीचा २१ जुलै हा वर्धापन दिन ठण्यासाह राज्यभरात विद्यार्थ्याना शालेय वस्तूंचे वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबिरे मेडिकल कॅम्प , रुग्णांना मदत करून साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संखेने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form