खाजा मुजावर यांच्या बदलीच्या मागणीसाठी दंडवत आंदोलनाचा इशारा

सोलापूर (प्रतिनिधी)– सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेले ग्रेड पीएसआय महमद युसुफ अब्बास मुजावर ऊर्फ खाजा यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत लोकशासन आंदोलन पार्टी जिल्हाध्यक मारुती जाधव राजू दिंडोरे यांनी तात्काळ बदलीची मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास १० जून रोजी दंडवत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनात खाजा मुजावर यांच्यावर त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर अमाप स्थावर व जंगम मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कथित मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, काही माजी व विद्यमान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष संरक्षण व पाठबळ दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायातून कथित आर्थिक लाभ मिळत असल्याचा दावा सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.आंदोलनकर्त्यांनी खाजा मुजावर यांची माळशिरस, सांगोला किंवा करमाळा येथे बदली करावी, अन्यथा बुधवार, १० जून रोजी चार पुतळा ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा दंडवत मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.दरम्यान, निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा पोलीस विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून, संबंधित यंत्रणांकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post