सोलापूर(प्रतिनिधी)-सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत गायकवाड तसेच सिध्दार्थ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लघुउद्योजक, छोटे व्यावसायिक आणि असंघटित बांधकाम कामगारांना आर्थिक बळ देण्यासाठी विविध लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे तसेच बांधकाम कामगारांचे साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद सामाजिक कार्यकर्त्या तथा लोकशाही मतदार चे प्रतिनिधी प्राजक्ता गायकवाड सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हनुमंत मामा देसाई, अशोक आडके मामा, सामाजिक कार्यकर्ते तसेच सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भाऊ गायकवाड उपस्थित होते.
यावेळी लघुउद्योग उभारणीसाठी विविध लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये लता शिलगारी यांना गारमेंट व्यवसायासाठी १० लाख रुपये, वेंकटेश आवार यांना गारमेंट व्यवसायासाठी ५ लाख रुपये, प्रकाश हुंडेकरी यांना फर्निचर व्यवसायासाठी १० लाख रुपये तर महादेव चव्हाण यांना ऑटोमोबाईल व्यवसायासाठी ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत फळविक्री, भाजीपाला विक्री, पापड व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री आदी लघु व्यवसाय करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये शंकर भैरी, जगदीश खड्डे, बसम्मा पुजारी, आसिफ शेख, गंगा हेरकल, सविता पारोळे, नागेश नाटेकर, अर्चना भोसले, जयश्री चव्हाण, निर्मला कोटा, रेणुका कटकधोड, लक्ष्मी जाधव, अनिता बोली, अंबादास करदास, रागिनी स्वामी, बसमा स्वामी, अनिता कळस्कर, गीता मामडेकर, चंद्रकांत चिंताकिदी, गणेश बोली, ललिता चिंताकिदी आदींचा समावेश होता.याशिवाय, असंघटित बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी या उद्देशाने त्यांना बांधकाम साहित्याचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे लाभार्थी आणि उपस्थितांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.यावेळी मान्यवरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे सक्षमीकरण यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

