दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - स्वतःच्या स्वार्थासाठी सूडबुद्धीने आमची बदनामी केली असून, राजकीय दबाव तंत्र वापरून दमदाटी करण्यात आली आहे, असा खुलासा तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. आनंद गोडसे, डॉ. सुनंदा राऊतराव यांनी केला आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात मी स्वःता आणि डॉ. राऊतराव आम्ही दोघेजण गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहोत. मात्र दरम्यानच्या काळात कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा कोणीही तक्रार केलेली नव्हती. सन २०२० मध्ये चुकीची
केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये आमच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. आमच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आणि बिन बुडाचे आहेत.स्वतःच्या स्वार्थासाठी, आमची नाहक बदनामी करण्यासाठी, घाणेरडे आरोप करीत राजकीय दबाव तंत्राचा अवलंब करण्यात आला. हे सर्व चुकीचे आहे.
डॉ. राऊतराव म्हणाल्या...मी अत्यंत गरीब परिस्थितीतून डॉक्टर बनलेय. अशातच कोवीड काळात माझे आई-वडील दोघे गेले. माझा सर्व आधार येथे संपला, मी नैराश्य झाली. अशातच माझ्यावर केलेले आरोप, त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्याचा मला मानसिक त्रास झाला. तरीसुद्धा त्या अवस्थेत मी कामावर होते. असे असताना सूडबुद्धीने आमची वारंवार बदनामी केली गेली. काही दिवसांपूर्वी माझ्या भावाचेही मयत झाले. या सर्व मानसिकतेमधून मी सावरत असताना आमची बदनामी करण्याचा षडयंत्र रचला जात असून, याचा मला खूप त्रास होत आहे. आमच्यावर जे काही आरोप केले गेले, त्या आरोपासंदर्भात जे काही चुकीचे आहे, त्याचा खुलासा आम्ही लेखी स्वरूपात देवू. संबंधीत घटनेची वास्तविकता काय आहे, याची माहिती जनतेसमोर आणावी, अशी विनंती डॉ. गोडसे आणि डॉ. राऊतराव यांनी केली आहे.
अनेक दिवसापासून आम्ही एकत्रित असल्याचा आरोप -
तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अनेक गावे येतात. छोटी छोटी गावे याला जोडली गेलेली आहेत. परिसरातील २० ते ३० हजार लोकसंख्येचा परिसर या आरोग्य केंद्राच्या अंमलाखाली येतो. आम्ही कोवीड काळात चांगले काम केले आहे. तशा बातम्यादेखील अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत.
आमची सुट्टी जरी असली तरी जर एखाद्या रुग्णाचा फोन जरी आला तर आम्ही लगेच केंद्रावर हजर राहतो. आम्हाला जेवायलादेखील वेळ नसत, मग आम्ही रुग्णालयातून बाहेर कोठे जाणार? कोणत्याही रुग्णांशी आम्ही उद्धट बोलत नाही. अथवा गैरवर्तनदेखील आमच्याकडून होत नाही. उलट आम्ही सर्व पेशंट आमच्या जवळचे समजतो. आमच्यावरील सर्व आरोप हे सूडबुद्धीने आणि बिनबुडाचे आहेत.
Tags
सोलापूर