दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - लोधी समाजाची विरंगणा राणी अवंतीबाई लोधी यांचा पुर्णाकृती पुतळा नानी-नानी पार्क येथे बसविणेबाबत, महापालिका जनरल बोर्डात ठराव झालेला असून सदर पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावे लोधी समाजाचे १८५७ ची विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांचा पुर्णाकृती पुतळा नानी-नानी पार्क येथे बसविणेबाबत सोलापूर महानगर पालिकेने जनरल बोर्डामध्ये सर्वानुमते मंजूरी मिळालेली होती. तसेच मनपा स्टॅडिंग कमिटीकडून सुध्दा पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. त्यांनतर सदर विषयाबाबत कुठलीही हालचाल महापालिकेकडून झालेली नाही. लवकरात लवकर नाना - नानी पार्क मध्ये विरंगणा राणी अवंतीबाई लोधी यांचा पुतळा बसवून सोलापूरमधील लोधी समाज बांधवांना न्याय देण्यात यावी यासाठी सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे धडाडीचे नेते जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
