दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापूरातील नामवंत दयानंद शिक्षण संस्थेतील डी.पी.बी. दयानंद शिक्षणशास्त्र महाविदयालयतील प्रथम प्राचार्य के. कृष्णाजी शेषाद्री माडीकर यांच्या स्मरणार्थ दयानंद शिक्षणशास्त्र महाविदयालय, सोलापूर व श्री. अतुल कृष्णाजी मार्डीकर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दयानंद डॉ माडीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार सोलापूर जिल्हयातील तीन शिक्षकांना दिला जातो. के. माडीकर सर हे 1955 ते 1981 पर्यंत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. अत्यंत शांत, शिस्तप्रिय, विज्ञाननिष्ठ व शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या स्मरणार्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक पातळीवर प्रत्येकी एका शिक्षकास/शिक्षिकेस पुरस्कार देवून गौरविले जाते. रोख पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन विशेष कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार केला जातो.
या पारितोषिकासाठी सोलापूर जिल्हयातील शिक्षकांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले जाते. प्रस्तावाचे फॉर्म महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत निःशुल्क उपलब्ध आहेत. सदर प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 05 मार्च 2024 पर्यत महाविद्यालयाच्या कार्यालयात सादर करावेत. आलेल्या प्रस्तावाचे नामवंत शिक्षक व तज्ञांकडून परीक्षण करुन शिक्षक सक्षमता पुरस्कारासाठी निवड केली जाते. निवड झालेल्या शिक्षकांना कार्यालयातर्फे कळवून व वृत्तपत्रामध्ये माहिती देऊन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतला जातो. शाळेतील मुख्याध्यापक अथवा शाळाप्रमुख महाविद्यालयाकडे विशेष योगदान असणा-या शिक्षकांचे नामनिर्देशनही करू शकतात. यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. महाविद्यालयचा दुरध्वनी नंबर-0217-2373237, 0217-2374400 या क्रमांकावर संपर्क साधावा.
डॉ. व्ही. बी. किडगांवकर - ९८३४०७४८६८/ प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर ९२७१२०८७९९ यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
सोलापूर