माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

दैनिक_लोकशाही_मतदार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले.ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते.हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे निदान झाले. त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3.02 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form