दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर :- एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील 15 दिवसापासुन होत असलेल्या घरफोड्या रोखणे व उघडकीस आणणेकरीता मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार सोो, पोलीस उप-आयुक्त (परि.) श्री. विजय कबाडे व सपोआ वि-1 श्री. अशोक तोरडमल यांनी वपोनि/एमआयडीसी पोलीस ठाणे श्री. प्रमोद वाघमारे यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वपोनि एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नंदकिशोर सोळुंके यांचेसह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशीत केले होते.दि. 20/04/2024 रोजी पोशम्मा मंदिर विडी घरकुल, सोलापूर येथील वर्षा हॉटेल परमिट रूम बार मध्ये विविध विदेशी कंपनीचे 04 दारूचे बॉक्स व रोख रक्कम तसेच वायफाय राऊटर असे एकुण 96,160/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेले वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सदर गुन्ह्यामध्ये पोकॉ/ सुहास अर्जुन यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मागोवा घेत माहिती घेतली व गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीत क्र. (1) शिवराज गुरुनाथ माळी, वय 31, रा. कोंड्याल शाळेजवळ, एमआयडीसी, सोलापूर शहर, आरोपीत क्र. (2) राजकुमार सोमय्या स्वामी, वय-22, रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर शहर, आरोपीत क्र. (3) वरुणराज गोविंदराज कोंतम, वय-22, रा. लक्ष्मी चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर शहर असे एकुण 3 जामीनावर सुटलेले आरोपी यांना अटक करून गुन्ह्यातील गेला माल मधील संपुर्ण विदेशी दारू तसेच रोख रक्कम 10,000/- रू जप्त करण्यात आले तसेच गुन्ह्यामधील गुन्हा करतेवेळी वापरलेले 2 मोटार सायकल व 1 चारचाकी टेम्पो असा 4,60,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. 23/04/2024 रोजी आय ग्रुप शाहु शाळेजवळ, जुना विडी घरकुल, सोलापूर येथे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने व 16 तोळे चांदिचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 76,000/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेले वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दि. 02/05/2024 रोजी पहाटेच्या वेळेस गणेश नगर, मुळेगाव रोड, सोलापूर येथील एका राहत्या घरातील विविध कंपनीचे 5 मोबाईल, 35 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने असा एकुण 1,15,899/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेले वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोकॉ। काशीनाथ वाघे, पोकॉ शंकर याळगी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली व गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही तासात विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा सचोटीने तपास करून दोन्ही गुन्हयातील एकुण 1.74.200/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
उघडकीस आणलेले गुन्हे खालीलप्रमाणे
1) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं 240/2024 भादविक 454,457,380
2) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं 246/2023 भादविक 454,457,380
3) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं 267/2024 भादविक 457,380
वरील नमुद गुन्हयातील आरोपीकडुन एकुण 6,76,360/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करून एकुण 03 आरोपी अटक व 01 विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परि.) विजय कबाडे,सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वपोनि/प्रमोद वाघमारे, पोनि/विजय खोमणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकुमार सोळुंके, पोहेकॉ राकेश पाटील, पोहेकॉ एकनाथ उबाळे, पोहेकॉ दिपक डोके, पोहेकॉ सचिन भांगे, पोना/मंगेश गायकवाड, पोकॉ शैलेश स्वामी, पोकॉ अमसिध्द निंबाळ, पोकॉ अमोल यादव, पोकॉ काशिनाथ वाघे, पोकॉ/ दिपक नारायणकर, पोकॉ अमर शिवसिंगवाले, पोकॉ/सुहास अर्जुन, पोकॉ/शंकर याळगी, पोकों/देवीदास कदम, पोकों/ भारतसिंग तुक्कुवाले यांनी बजावली.
.jpeg)