काल तहसीलदार निलंबनाचा जल्लोष तर आज 2 कोटी रुपयांचा खंडणीचा गुन्हा ; प्रहारची सोलापुरात अशी झाली दशा , त्यात होरपळला महिला आरोग्य अधिकाऱ्याला छळणारा पत्रकार

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-बदलीच्या संदर्भाने बदनामीकारक बातम्या प्रसारित करून त्रास देणाऱ्या तिघांनी दोन कोटींची रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद महापालिकेच्या वैद्यकीय  अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून प्रहार संघटनेचे पदाधिकारी अजित कुलकर्णी पत्रकार सैपन शेख व रणजित वाघमारे या तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. २ दिवसांपूर्वीच मोहोळ च्या तहसीलदाराला निलंबित केल्याप्रकरणी प्रहरचा दणका असल्याचे सांगत पेढे वाटून प्रहार संघटनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला होता.तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी २ कोटी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर बातमी अशी की.

शासनाच्या वतीने सोलापूर महापालिकेच्या आरोग्याधिकारी म्हणून - डॉ. राखी माने यांची नियुक्ती झाली. - त्यानंतर बदलीच्या अनुषंगाने सैपन - शेख व रणजित वाघमारे यांनी सतत बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या. बदनामीच्या त्रासातून डॉ. माने या प्रहार संघटनेच्या अजित कुलकर्णी यांना 

भेटायला त्यांच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी दोन कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने वाघमारे याच्याकडे पाठविले. त्यानेही सतत पैशांची मागणी करून त्रास दिला. पैसे नाही दिल्यास त्रास होईल, अशी धमकी देखील त्यांनी दिली. कुलकर्णी याने आरोग्य विभागाचे उपसंचालक

डॉ. राधाकिशन पवार यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन दोन कोटींची मागणी केली. पैसे न दिल्याच्या कारणातून तिघांनी मिळून त्यांच्या स्वतःच्या चॅनल, पोर्टलवर बातम्या प्रसारित करून बदनामी केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक ढवळे तपास करीत.

मनीष काळजेंच्या कार्यालयाचा उल्लेख 

11जून ते आजपर्यंत तिन्ही संशयित आरोपीसोबत शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात फिर्यादी व आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांच्या कार्यालयात बोलणी झाल्याचेही पोलिसांकडील फिर्यादीत नमूद आहे. आता मनिष काळजे यांच्या कार्यालयात कश्यासाठी बोलवण्यात आले, याचाही पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form