संपादकीय | दामिनी व निर्भया पथक निरंतर चालणे गरजेचे

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर पोलिस आयुक्तालय अंतर्गत दामिनी पथकाने सात रस्ता परिसरातील १७ रोड रोमिओंवर काही दिवसांपूर्वी कारवाई केली. विद्यार्थ्यांना समज देऊन सोडण्यात आले. दामिनी पथकातर्फे शाळा, कॉलेज, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली जात आहे. सात रस्ता परिसरातील रोडरोमिओ तसेच किल्ला बगीचा मधील सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यावर कारवाई केली. विद्यार्थिनींना छेडछाड होत असल्याचा प्रकार आढळल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचेही आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र दामिनी पथक हे निरंतर चालणे गरजेचे जेणेकरून गुन्हेगारी वृत्तीच्या मार्गावर असणाऱ्या युवकांमध्ये एक दबदबा निर्माण होईल. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी दामिनी पथक ने कारवाई सुरू केली होती मात्र काही काळ लोटल्यानंतर हे या पथकाची कारवाई थंडवल्याचे निदर्शनास आले असून हल्ली शहरातील महाविद्यालयात आणि महाविद्यालय परिसरात मुलींना छेडछाड होण्याचे प्रमाण हल्ली वाढल्याचे दिसून येत आहे बदलापूर च्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस प्रशासनाचे जागल्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते काही ठिकाणी "दामिनी पथक" तर काही ठिकाणी "निर्भया पथक" या नावाने विशेष पथके तयार करून गस्त घालण्याचे काम सुरू झाले. असो पोलिस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले हे देखील कौतुकास्पद आहे. पण हे पथक निरंतर टिकून तसेच कार्यरत राहावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या दोन्ही पथकांकडे सध्या पालकवर्ग आशेच्या नजरेने पाहत आहेत.शिवाय गस्तीचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. रात्री अपरात्री देखील या पथकांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.महिला मुली सध्या राज्यात चालू असलेली परिस्थिती पाहता भीतीदायक वातावरणात आहेत महिला व मुलीमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. शाळेतील चिमुकल्या पासून ते काम करणाऱ्या महिला अत्याचार अन्याय पासून कधी सुटका मिळेल या भावनेत आहेत. यातच शालेय पाठ्यपुस्तकात आत्मसंरक्षणाच्या धड्यांचा समावेश व्हावा ही देखील मागणी जोर पकडुन असतानाच दोन दिवसांपूर्वीच मंगल प्रभात लोढा यांनीदेखील आयटीआय मध्ये "हर घर दुर्गा" या शिर्षकाखाली आत्मसंरक्षणाच्या धड्यांचा समावेश करणार असल्याचे घोषणा केली आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये आत्मसंरक्षणासाठी कराटे सेल्फ डिफेन्स सारख्या शिबिरे वेळोवेळी राबवणे गरजेचे आहे. जितकी प्रशासनाची जबाबदारी आहे तितकेच पालकांची देखील जबाबदारी मोठी आहे आपल्या मुलींना अन्य वर्गातील विभागातील शिक्षण देत असताना स्वरक्षणाचे शिक्षण देणे देखील महत्त्वाचे आहे. जेणेकरून वेळीच आपल्या भगिनी स्वतःचे संरक्षण करू शकतील. असो अश्या घटनांमुळे सरकार प्रशासन सोबतच जनता देखील काय बोध घेणार आणि कश्या पद्धतीने जागरूक होणार हेही पाहणं जमेची बाब ठरणार आहे.

  • संपादक - अक्षय बबलाद 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form