मोठी बातमी! दक्षिण मध्ये गुप्त मीटिंग घेणारा हा एम आय एम चा हुकमी एक्का कोण...!!

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच सोलापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांची नावे येत असताना त्यामध्ये लोक प्रधान न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा आयाज भाई शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आयाज भाई शेख हे एम आय पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 
  एकीकडे सोलापूर शहर मध्य मधून मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला काँग्रेसकडून तिकीट मिळावे व मुस्लिम समाजाचा व्यक्ती आमदार व्हावा अशी सर्वांची इच्छा व्यक्त होत होती.त्यासाठी सोलापूर शहर मध्य मतदार संघातून मुस्लिम समाजाला तिकीट मिळावे अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून जोर धरू लागली आहे. व यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जोरदार मागणी होत होती . अशातच एमआयएम कडून फारूक शाब्दी यांचे शहर मध्य मधून उमेदवारी देखील निश्चित झाली होती. या सर्व घडामोडी घडत असताना पक्षाने बाबा मिस्त्री यांना मध्य मधून मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. एमआयएम च्या शाब्दींपूढे काँग्रेसने बाबा मिस्त्री यांना पुढे करत असल्याचे चित्र स्पष्ट होत असताना दुसरीकडे एमआयएम ने दक्षिणमधून देखील उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्ये एमआयएम साठी सात ते आठ जण इच्छुक आहे. यामध्ये दक्षिणमधून एम आय एम चा हुकमी एक्का म्हणून लोक प्रधान न्यूज चॅनलचे सर्वे सर्व अयाज शेख यांचे नाव समोर आले आहे. मध्य मध्ये शाब्दींच्या समोर मुस्लिम समाजाचा काँग्रेसचा उमेदवार देऊन अडचण निर्माण केले जात असताना दक्षिणमधून एम आय एम चा उमेदवार रिंगणात उतरवून मोठी रणनीती एमआयएम ने आखली आहे. 
 अशातच मध्य मधून बाबा मिस्त्री यांचे नाव पुढे आले असताना अचानक पने बाबा मिस्त्री यांनी मध्य मधून माघार घेतल्याचे समोर येत आहे. बाबा मध्य मधून नाही तर मी दक्षिणमधून इच्छुक असल्याचे देखील सांगत आहे.  
 या सर्व घडामोडी घडत असतानाच दक्षिण मध्ये एमआयएम साठी इच्छुक असलेले आयाज शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास मीटिंग घेऊन आपला गुप्त प्रचार सुरू केला आहे. काहीही होऊ दे दक्षिण मध्ये एमआयएमचां विजयी पताका फडकवणारच अशी भूमिका आयाज शेख यांनी घेतल्याचे दिसत आहे. . आयाज शेख यांचा दक्षिण मध्ये मोठा जनसंपर्क आहे . अनेक मित्रमंडळींसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत . आणि त्याच आधारे आयाज शेख यांनी अनेक गावात गावभेट दौरे देखील केले आहेत. एम आय मध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये सात ते आठ जणांची नावे चर्चेत असतानाच आयाज शेख हे देखील एमआयएमचे प्रबळ दावेदार दक्षिण मध्ये दिसत आहे. आयाज शेख यांनी दक्षिण मध्ये तळागाळातील लोकांना घेऊन आपली कामे सुरू केली आहेत. आयाज शेख हे निवडणूक रिंगणात येणार हे कळताच त्यांच्या अनेक मित्रांनी आपल्या एका मित्रासाठी जोरदार रणनीती आखल्याचे दिसत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे तिकीट मिळवून आयाज शेख मोठा चमत्कार करणार असल्याचे बोलले जात आहे. लोक प्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना न्याय देऊन सोलापूरच्या अनेक गंभीर समस्यांना वाचा फोडण्यात आयाज शेख यांची भूमिका महत्त्वाची आहे. आयाज शेख हे दक्षिण साठी एमआयएमचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. एकीकडे एमआयएम ने मध्य मध्ये विजयाचा दावा केला आहे तर दक्षिण मध्ये देखील आयाज शेख यांच्या रूपाने तगडा उमेदवार रणांगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. एमआयएम पक्ष आयाज शेख यांना दक्षिण मध्ये तिकीट देतील का ? एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारूक शब्दि आयाज शेख यांच्यावर विश्वास दाखवतील का? का आयाज शेख अनेक मातब्बर नेत्यांवर भारी पडतील? हे पाहावे लागेल. आयाज शेख दक्षिण मध्ये एमआयएम कडून यशस्वी होतील असे देखील बोलले जात आहे. दक्षिण मध्ये असलेला दांडगा जनसंपर्क व जनतेची असलेली जाण.. या जोरावर अनेक मातब्बर नेत्यांना आयाज शेख एम आय एम मधून टक्कर देतील असे बोलले जात आहे. त्यामुळे फारुख शाब्दि व त्यांचे वरिष्ठ एम आय एम चे नेते मंडळी आयाज शेख यांच्याबाबतीत काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form