सोलापूर जिल्ह्यात बहुजन समाज पार्टी 'हा' पक्ष ठरला नंबर १!! कसे ते वाचा सविस्तर बातमी..

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) | अक्षय बबलाद :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जशी जाहीर झाली तशी सर्वच पक्षांची उमेदवारी संदर्भात तसेच आघाडी व युतीतील जागे संदर्भात वाटाघाटी ला सुरुवात झाले त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील गेल्या १० ते १५ दिवसांपासून महायुती सह महाविकास आघाडी मध्ये देखील चांगलेच नाट्यमय घडामोडी घडताना सोलापूरकरांनी पाहिले. विविध पक्षातील नेत्यांनी उमेदवारी साठी बंड चा नारा दिला काहींनी बंड देखील केले तर काहींनी उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी शड्डू ठोकले तर काहींनी महायुती मधील मित्रपक्षांतील उमेदवारांनी बंड करत तिसऱ्या आघाडीत सामील झाले आहे. सर्व प्रकारच्या राजकीय नाट्यमय, हाय होल्टेज ड्रामा चालू असतानाच बहुजन समाज पार्टीने सोलापूर जिल्ह्यात ११ तालुक्यात प्रत्येकी १ असे एकूण ११ उमेदवार देत सर्वच ठिकाणी उमेदवारी जाहीर करून बहुजन समाज पार्टी उमेदवारी देण्यात सोलापूर जिल्ह्यात नंबर १ ठरल्याची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात होत आहे. सोलापूर जिल्ह्यात बहुजन समाज पार्टी ही पूर्णपणे ताकतीने आणि स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे दैनिक लोकशाही मतदार शी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.संजीव सदाफुले यांनी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात बहुजन समाज पक्ष विविध मुद्द्यांवर वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांच्या प्रश्नांवर, प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर लढा देणार असून आमच्या या लढ्यात सर्वच समाजाचे लोक सामील असून अठरा पगड जातींना घेऊन ही आमची निवडणुकीची लढाई असेल असे म्हणाले. तसेच देशभरात आजवर घडलेल्या अघटीत घटनांना अधोरेखित करत जनतेने लक्षात ठेवून योग्य उमेदवार निवडून देऊन आपल्या मतदार संघाला न्याय द्यावा असेही आवाहन मतदारांना ऍड.सदाफुले यांनी केले.याप्रसंगी दैनिक लोकशाही मतदार शी संवाद साधताना राज्य कार्यकारिणी सदस्य - आपासाहेब लोकरे , सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

असे आहेत बहुजन समाज पार्टीचे ११ उमेदवार -

१)- सोलापूर शहर मध्य - सुभाष गायकवाड

२)- सोलापूर शहर उत्तर - शिलवंत काळे

३)- दक्षिण सोलापूर - कपिल कोळी

४)- करमाळा - संजय शिंदे

५)- माढा - अभिजित पाटील 

६)- बार्शी - मनोज कांबळे

७)- मोहोळ (sc) - बळीराम मोरे

८)- अक्कलकोट - इकरार शेख

९)- पंढरपूर - दत्ता वाडेकर

१०)- सांगोला - शशिकांत गडहिरे

११)- माळशिरस - ससाणे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form