सोलापूर (प्रतिनिधी)-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आप्पासाहेब लंगोटे यांना ब्रिलियंट ग्रूप वतीने‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, तसेच समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यात उपस्थित असलेले सिव्हिल हॉस्पिटल चे डीन डॉ.ऋत्विक जयकर यांच्या हस्ते अप्पासाहेब लंगोटे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी ब्रिलियंट ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर डॉ.विठ्ठल धडके ब्रिलियंट ग्रूपचे अध्यक्षा प्रणाली रासे यांसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांनी अप्पासाहेब लंगोटे यांच्या कार्याचे कौतुक करत, समाजासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची प्रशंसा केली.आप्पासाहेब लंगोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून, यापुढेही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे.” त्यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना व मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना दिले.कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
सोलापूर

