नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर



सोलापूर (प्रतिनिधी)- फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपीने स्वतःची “भारतीय कॉंग्रेस संघटना” नावाची संस्था असल्याचे भासवून पुणे महानगरपालिकेत लिपीक, परिचारिका व इतर पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीसह इतरांकडून सुमारे १९,२०,००० रुपये घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादी पक्षाने आरोपीने लोकांची फसवणूक करून पैसे उकळल्याचे सांगून जामीनास विरोध केला होता. आरोपी तर्फे ॲड सागर कांतिलाल हंबीरराव यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड. सुबोध शिवशरण,ॲड. चैतन्य केंगार,ॲड.रोहित थोरात,ॲड.दिनेश माळगोंडे यांनी सहाय्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post