प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्तांचे धरणे आंदोलन : आंदोलनात १५० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांनी नोंदवला सहभाग

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे बँक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून १५० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला.बँकेने सेवानिवृत्तांचे अनेक आर्थिक लाभ दीर्घकाळापासून अडवून ठेवले आहेत. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतात. मात्र आज अनेक कर्मचारी मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा- संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन पांडागळे यांनी प्रास्ताविकात प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर प्रकाश टाकला. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की बँक आणि ईपीएफ कार्यालय या दोन्ही माध्यमांतून पीएफच्या रकमा अडवून ठेवल्या आहेत. रजा रोखीकरण दिलेले नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे.७० ते ८० वयोगटातील असतानाही त्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही खेदाची बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या सूचना असूनही बँक प्रशासन त्या राबवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. भारतीय मजदूर संघाचे जिल्हा चिटणीस धनंजय वझरकर यांनी इशारा दिला की, 'जर प्रशासनाने त्वरित निर्णय घेतला नाही, तर शहरातील इतर सर्व कामगार संघटना या आंदोलनात उतरतील.' या वेळी आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक दत्तात्रय कावेरी व सहायक सरव्यवस्थापक बाळासाहेब घोगरे यांनी निवेदन यावेळी सोलापूरहून अशोक साबळे देखील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post