जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याचबरोबर अंध अपंग दिव्यांग समाजातील शोषित व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी ब्रिलियंट टाइम्स  या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात  अडचणीत असलेल्या माणसांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे  समाजातील वंचित गरीब लोकांना जातीचा दाखला उत्पन्न दाखला रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजना आरोग्य योजना  घरकुल योजना विमा योजना  इत्यादी शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या  त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन समाजातील वंचितांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शांत संयमी व व नेहमी हसतमुख असलेले इम्तियाज अक्कलकोटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अन्सर तांबोळी (बी एस ) तसेच शहराध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते इम्तियाज अक्कलकोटकर यांना शाल पुष्पगुच्छ व मिठाई भरून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या  यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी लतीफ शेख असलम नदाफ इस्माईल शेख मोहम्मद शेख मल्लिकार्जुन हेगडे वसीम बागवान वैजनाथ बिराजदार सुनील खांडेकर इसाक डोका मुस्तफा राजभरे यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी अनेक पत्रकारांनी आपल्या मनोगतामध्ये  इम्तियाज अक्कलकोटकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना आभाळभर शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form