सोलापूर (प्रतिनिधी)-एमआयडीसी पोलीस स्टेशनव्या हद्दीतील भीम जयंती उत्सव साजरा करणाऱ्या विविध मंडळांना येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वस्त समिती (पूर्व विभाग, सोलापूर)" यांची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाच्या आयोजनादरम्यान मंडळांना विविध प्रशासकीय, परवानगी, कायदा व सुव्यवस्था तसेच इतर सुविधा संदर्भातील अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर समन्वयाने उपयोजना करण्याच्या उद्देशने ही समिती कार्यरत राहणार आहे. समितीच्या माध्यमातून संबंधीत पोलीस प्रशासन, महापालिका तसेच इतर शाकीय विभागांशी संवाद साधून मंडळांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यात येईल. तसेच, भीम जयंती उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.या समितीमुळे सर्व मंडळांना एक व्यासपीठ उपलब्ध होवून त्यांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सर्व भीम जयंती मंडळांनी या समितीशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आव्हान पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस महेश डोलारे गंगाधर बनसोडे शिवा गायकवाड गौतम चौधरी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
Tags:
सोलापूर
