सदगुरु बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची दिवाळी अनाथ आणि बेघरांसोबत साजरी

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा हात द्यावा या उद्धेशाने फराळाचे वाटप करून त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत सोलापूर येथील सदगुरु बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने शनिवार दि. 2 नोव्हेंबरला निलम नगर येथील शांताई अनाथ आश्रमात मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
याप्रसंगी सदगुरु बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री वंजारे - बनसोडे, संगप्पा कांबळे व राहूल उडाणशिव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले . अध्यक्षा भाग्यश्री वंजारे - बनसोडे यांच्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
तसेच याप्रसंगी रस्त्यावरून फिरणारे तसेच सिव्हिल हॉस्पिटल समोरील अनाथांनाही यावेळी संस्थेच्या वतीने वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री वंजारे - बनसोडे, राजू नामन, संस्थेचे कार्याध्यक्ष तुकाराम द्यावरकोंडा आदीजण उपस्थित होते.
सादर कार्यक्रमासाठी गणेश मिसाळ, मल्येश जोगळेकर आदींनी परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form