संपादकीय | तरुणांनो आज जरा जपूनच

 


देशभरासह महाराष्ट्रात आज ३१ डिसेंबर वर्षाखेर हे सरते वर्ष असून नवीन वर्षाचे. स्वागतोस्तव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल लॉन शेती अश्या विविध उपक्रम डिजे नाईट खान पान हे मोठ्या जोमात सुरू असतं नवं वर्षाचं स्वागत नक्कीच करावं पण तरुणांनी थोडसं जपूनच. कारण दरवर्षी वर्षाखेरीस आपण नवं वर्षाचं स्वागत करताना मद्यपान करून अनेक ठिकाणी अपघात झालेले पाहतो त्यात मद्यधुंद होऊन वेगाने वाहन चालविणे हुल्लडबाजी करत असताना अपघात होणे असे विविध कारणांमुळे कित्येक ठिकाणी मृत देखील पावतात तसे बातम्या देखील आपण वाचतो पाहतो त्यामुळे इतर वर्गांपेक्षा मद्यपान करण्याचे प्रमाण तरुण वर्गात जास्त असल्याने तरुणांनी नवं वर्षाचं स्वागत हे आपल्या मर्यादेतच राहून मौज मजा करावे जेणेकरून नवं वर्ष हे सुख समृद्धी आणि सुरक्षित जाईल तसा पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त असतोच मात्र बंदोबस्ताला फाटा देऊन कसे आपले वाहन पुढे सर करायचे हे आजच्या तरुणाईला नवीन नाहीच.तरुणाईने नवं वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करणे शक्य असेल तेवढे टाळून काहीतरी नव नवीन समाज उपयोगी उपक्रम राबवले पाहिजे जेणेकरून त्याचा सर्वांनाच फायदा होऊ शकतो ३१ डिसेंबर आणि तरुणाई हे एक वेगळच समीकरण आहे हे सर्वानाच ज्ञात आहे.हुल्लडबाजी करणे कर्कश आवाजात गाड्यांचे हॉर्न वाजवणे गाड्यांचा आवाज मोठ्याने काढणे असे प्रकार शक्यतो टाळले तर बरेच. शेवटी तरुणाई आपल्या जबाबदाऱ्या ओळखून नवं वर्षाचं स्वागत जल्लोष करावे हिच अपेक्षा, हा सरता वर्ष आपल्यासह सर्वांनाच सुखाच जावं कोणालाही अडचणी निर्माण करून नये याची काळजी घेणे गरजेचे. सर्व देशवासीयांना नवं वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना येणारं नवं वर्ष सुखाच समृद्धीच आणि आरोग्यदायी जावो हिच दैनिक लोकशाही मतदार वतीने सदिच्छा. - अक्षय बबलाद - मुख्य संपादक - दैनिक लोकशाही मतदार 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form