ब्रिलीयंट ग्रुप वतीने यशवंत पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर शनिवारी होणार वितरण



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेल्या नऊ वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या  माध्यमातून  समाजातील रंजलेल्या गांजलेल्या वंचित शोषित पीडित त्याच बरोबर अन्यायग्रस्त लोकांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीचा परखड आवाज  प्रशासन दरबारात काढून वंचित पीडित घटकाच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपलं उभं आयुष्य पणाला लावणारे तसेच पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून  ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून  खरी खुरी पत्रकारिता जपणारे  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार यांना सोलापूर येथील  ब्रिलियंट ग्रुप च्या वतीने  2025 चा आदर्श पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आला असून  शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सोलापूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल डफरीन चौक  येथे आदरपूर्वक सन्मान चिन्ह सन्मानपत्र  देऊन गौरव करणार असल्याची माहिती  ब्रिलियंट ग्रुपचे  अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर उपाध्यक्ष डॉ संजीवनी कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form