दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- दिनांक ०३/०१/२०२४ रोजी १६.३० वा ते १८.०० वा पर्यंत जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे पोलीस ठाणे हद्दीतील महिला दक्षता समितीची मिटींग सपोआ प्रताप पोमण विभाग ०१ सोलापूर शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख मॅडम, व इतर पोलीस स्टाफ व महिला दक्षता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये पोलीस रेझिंग डे, समाजामध्ये महिलांना कोणकोणत्या समस्या येतात, पोलीसांच्या वतीने महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जातात याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित महिलांना समाजामध्ये कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याबाबत उपस्थित महिलांना मत व्यक्त करण्यास सांगितले असता सदर बैठकीमध्ये उपस्थित महिलांनी शाळा, कॉलेज, ट्युशन या ठिकाणी वेळोवेळी गस्त वाढविण्याबाबत तसेच इतर सोयायटीमध्ये पोलीस ठाणेच्या वतीने महिलांची अधिकाधिक मिटींग घेवून कायद्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबत व महिला व मुलींचे समुपदेशन करणेबाबत सुचविण्यात आले. त्यावेळी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण साो यांनी शाळा, कॉलेज, ट्युशन येथे गस्त वाढविण्याबाबत व सोसायटी मध्ये पोलीसांच्या वतीने मिटींग घेण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीकरिता सपोआ प्रताप पोमण विभाग सोलापूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक शबनम शेख, व पोलीस ठाणे हद्दीतील दक्षता समितीच्या सदस्या १) सौ. मत्स्य गंधा चंद्रशेखर सुत्रावे २) अॅड किर्ती हिरेमठ ३) डॉ. सोनाली घोंगडे ४) लतसतसई विजयकुमार फुटाणे ५) उषा भिमपुरे ६) वंदना अजित गायकवाड ७) कोमल बेंगाने ८) सौ. अपर्णा बुरांडे ९) राजश्री बैलकुरमठ १०) रोहिणी हांडगे ११) गौरी भिमपुरे असे महिला उपस्थित होते. चहापान कार्यक्रमानंतर सदरची बैठक समाप्त करण्यात आली.
