ॲड. सागर हंबीरराव यांची दैनिक लोकशाही मतदार च्या कायदेशीर सल्लागार पदी निवड

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक लोकशाही मतदार जे गेल्या 2 वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण  महाराष्ट्रात प्रसिद्ध लोकप्रिय झाले आहे. वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना आपल्या आगळ्यावेगळ्या लेखणीच्या मध्यामधून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून परखड लेखणी सडेतोड लेखन करणारे वृत्तपत्र अशी ओळख निर्माण केले आहे.कायद्याचे महत्त्व लोकांना कळावे माहिती व्हावी जनता आपल्या हक्क अधिकार बाबत ज्ञात असावे यासाठी दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या उपस्थितीत दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड.सागर हंबीरराव यांची नियुक्ती करण्यात आले आहे.



सदरील नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीच्या पत्रकार दीन कार्यक्रमात करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समिती चे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष अंबादास शिंदे जेष्ठ विधीज्ञ ॲड.संजीव सदाफुले निवृत्त पोलिस अधिकारी अरुण कदम दैनिक लोकशाही मतदार चे निवासी संपादक व  जेष्ठ पत्रकार डॉ.किर्तीपाल गायकवाड कामगार नेते विष्णू कारमपुरी आदी सह इतर पत्रकार सुरक्षा समिती चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form