सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवा : मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने ;महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

दैनिक_लोकशाही_मतदार
 सोलापूर - सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये, अस्वच्छतेचे व मूलभूत गरजांच्या समस्यांची महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे., त्यामुळे संपूर्ण शहराच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून, शहरवासी यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि झोपडपट्टीतील समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब यांना मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली, शेकडो झोपडपट्टी रहिवासी यांच्यासोबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
     'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या' वतीने मा.महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात, सोलापूर शहरात एकूण १७७ झोपडपट्टी वसाहती आहेत. या वसाहतीत राहणारे रहिवासी हे अत्यंत गरीब, दारिद्र्य रेषेखालील दुर्बल व कामगार वर्गातील आहेत., त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाही., कारण पोट भरणेच कठीण अवस्था त्यांची असते. 
  'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या' 
वतीने, गेल्या दोन महिन्यापासून सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आला. या अभियानात अनेक आशा गंभीर समस्या समोर आल्या आहेत., *त्यापैकी प्रमुख समस्या या आहेत १.अनियमित पाणीपुरवठा २.अंतर्गत रस्ते ३.चेंबर भरल्याने घराघरात पाणी जाणे ४. कचऱ्याचे संकलन न होणे ५. घंटागाडी आठ दिवसातून एकदा येणे ६.दिवाबत्ती ७.नालासफाई ८.ड्रेनेज लाईन ९. उघडे गटारी  १०.धोकादायक विजेच्या तारा काढणे बाबत ११.मैला  मिश्रित व घाण पाणी पुरवठा बंद करणे बाबत १२.अत्यंत गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय पूर्णपणे अस्वच्छ व अत्यंत भयानक रूप धारण केलेले आहे.,* या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे., ही अवस्था व दुर्गंधी नाहीशी झाल्यास, सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना जीवनदान मिळणार आहे., म्हणून झोपडपट्टींच्या सर्व समस्या हे, सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारे आहेत. 
                सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने, अलीकडेच आपल्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. 
त्या अभियानाची व्याप्ती वाढवून सोलापुरातील झोपडपट्टीत स्वच्छता अभियान राबवावा व त्यात आमच्या निवेदनातील एक ते बारा समस्या व इतर मागण्यांचा समावेश केल्यास, ' _' *स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर' हे_ स्वप्न साकार होणार आहे. आणि त्याचबरोबर निरोगी सोलापूर होण्यास देखील वेळ लागणार नाही. 
   तरी माननीययांनी आमच्या 'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या', निवेदनाचा गांभीर्याने विचार करून, आमच्या मागण्या मान्य करून, सोलापूर शहरातील नागरिकांचे जीव वाचवावे., असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
  सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रमेश चिलबेरी, रेखा आडकी, राणी दासरी, कविता इराबत्ती, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका मीठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल,  भारती इराबत्ती, लक्ष्मी रच्चा, महालक्ष्मी गुंटला ,लक्ष्मी गुंटला, गीता करली, अंबवा येमुल, बालमनी इडप, कविता दोंतुल, लता चन्ना आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form