मुख्य संपादक - अक्षय बबलाद
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या काही महिन्यांपूर्वी जगन्नाथ बनसोडे यांच्या कार्यकाळात शहरातील रस्त्यांनी अवैध अतिक्रमणांपासून मोकळा श्वास घेतला होता.परंतु बनसोडे यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा शहरात/ गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमण पुन्हा कमालीचे डोके वर काढले आहे. बेगम पेठ सात रस्ता अशोक चौक नई जिंदगी ७० फूट रोड नवी पेठ सोनार गल्ली भुसार गल्ली मधला मारुती नवी पेठ कोर्ट ते विजापूर वेस रोड अश्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसा दुचाकी वाहन चालविणे म्हणजे एक मोठी कसरत होत आहे. या अतिक्रमण वर कोणाचाही अंकुश नसल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागलं आहे कारणही तेच,सक्षम अधिकारी नसणे. सोलापूर शहरात कामाच्या निमित्ताने नागरिक बाहेर पडताच 'काय हा अतिक्रमण आणि काय हा सोलापूर स्मार्ट सिटी' असा फज्जा व मज्जा नागरिकांमधून उडवताना दिसत आहे.विशेष करून महापालिका विभागाची अतिक्रमण कारवाई ही सायंकाळी ६ च्या नंतर होणे अपेक्षित कारण अनेक हात गाडे (भजी,चायनीज, मच्छी फ्राय) अश्या गाड्या सायंकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात असतात त्यामुळे महापालिका सोलापूर शहर अतिक्रमण मुक्त करायला सपशेल फेल ठरते तितकेच खरे. आताच नवनियुक्त झालेले महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या समोर शहरातील अतिक्रमण हटवणे आणि स्मार्ट सिटी असलेली सोलापूर शहर अतिक्रमण मुक्त करणे एक मोठे आवाहन बनले आहे आणि हे आवाहन आयुक्त ओम्बासे कशाप्रकारे पेलणार हे पाहण्यास सोलापूरकरांमध्ये मोठ उत्सुकतेच ठरलं आहे. नूतन आयुक्त बाजी मारणार की अतिक्रमण बाहद्दर 'यहांके हम सिकंदर' अश्या भूमिकेत राहणार हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
.jpeg)