दैनिक_लोकशाही_मतदार
केम- स्टेशनअंतर्गत केम दुरक्षेत्रातील पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमवारी (दि.२६) सकाळी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर छापा टाकत एकूण ₹5,47,014 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सदाशिव अजय मराठे (वय 28, रा. निमगाव टे, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 मे रोजी सकाळी 8.30 वाजता पोलीस हवालदार अमोल घुगे, पोहेकाँ शेख आणि पोकाँ चव्हाण हे केम ते वडशिवणे रोडवर पेट्रोलिंग करत असताना, वेताळबाबा मंदिराजवळ त्यांनी संशयास्पद पद्धतीने येणारी महिंद्रा बोलेरो (MH-45AQ-4759) गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू आढळून आली..जप्त करण्यात आलेल्या दारूचे तपशील पुढीलप्रमाणे आहेतः देशी दारू (संत्रा, ढोकी संत्रा, टाँगो पंच) - ₹28,140 विदेशी दारू (DSP, रॉयल टँग, ऑफिसर चॉईस, डॉक्टर ब्रँडी, मेकडॉन नं.1, ग्रँड मास्टर, इम्पिरियल ब्ल्यू, किंगफिशर बिअर) - ₹18,874 वाहन (महिंद्रा बोलेरो) ₹5,00,000 मालपोलिसांनी पंचासमक्ष सर्व मुद्देमाल जागेवरच जप्त केला असून, सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करीत आहेत.
Tags
करमाळा