दैनिक_लोकशाही_मतदार
करमाळा (प्रतिनिधी)| विशाल जाधव – शहरातील श्रीदेवीचामाळ रस्त्यावरील विविध समस्यांचे शुक्लकाष्ठ संपता संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. बायपास चौकाच्या मधोमध उभ्या असलेल्या समाधीसह विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या करमाळाकरांना या पुलाभोवताली झालेल्या खराब रस्त्यामुळे पाण्यातून विविध समस्यांचा सामना करत मार्ग काढावा लागत होते सुदैवाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असली तरी हे डांबरीकरण भर पावसात होत असल्याने या कामाचा दर्जा कितपत टिकाऊ राहील हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुवारी या ठिकाणी डांबरीकरणासाठी साहित्य आणून टाकण्यात आले आणि पडत्या पावसाची कोणतीही तमा न बाळगता या कामाला सुरुवात झाली. भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्यासह नागरिकांनीही सदर कामगारांना पडत्या पावसात डांबरीकरण करत असल्याबाबत विचारणा केली तरी हे काम सुरूच आहे असे सांगितले
शहरातील बहुतेक रस्त्यांची कामे करून फारसा कालावधी गेलेला नाही. मात्र काम करणाऱ्या ठेकेदारांवर कसलेही नियंत्रण नसल्याने सुमार दर्जाचे हे रस्ते लवकरच खराब होतात. मग पुन्हा या रस्त्यांची निविदा काढली जाते. हे चक्र असे चालत राहते. मात्र याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावे लागतो.
Tags
करमाळा