दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम पूर्ण जोर लावणार आहे.एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यातील इच्छुक उमेदवार शौकत पठाण यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी झाले होते.फक्त शहरपूरता मर्यादित न राहता ,जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एमआयएम पक्षाचा विस्तार होणार असल्याचे माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी माध्यमांना बोलताना दिली.
मंगळवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी इच्छुक पदाधिकाऱ्याच्या मुलाखती घेतल्या.सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत या अकरा तालुक्यात सर्व जाती धर्माच्या जनतेला आणि शेतकऱ्यांना प्रमुख स्थानी ठेवून तालुका अध्यक्ष पदावर निवड केली जाणार आहे.आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या सर्व जागांवर एमआयएम उमेदवार देणार आहे.सर्व जाती धर्माचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमच्या पतंग या चिन्हावर निवडणूक लढतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला जड जाणार आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेते एमआयएमच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली.मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून इच्छुक उमेदवार आणि इच्छुक पदाधिकारी हजर होते.शौकत पठाण यांच्या एमआयएम पक्षाच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील ग्रामीण भागात एमआयएम पक्षाचा विस्तार होत आहे.काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षापासून नाराज झालेल्याना एमआयएम हा उत्तम पर्याय असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
या बैठकीस माजी नगरसेवक तौफिक हत्तरे, प्रवक्ता इमरान हाफीसाहब, एमआयएमचे नेते सादिक नदाफ, ज्ञानेश्वर कांबळे, मधुकर कांबळे, मातंग समाजाचे अध्यक्ष राजु क्षिरसागर, लक्ष्मण बनसोडे, दादालाल पटेल, सलाम पटेल, सचिन कोलते, अमिन नदाफ, शब्बीर नदाफ, वसीम शेख, तारीक शेख, मोहसीन मुसा खाटके, तौसीफ इक्बाल काझी, मोहोद्दीन शेख, समीर काझी, फारूख दिलावर, मोहसीन बाबू शेख, जिलानी पटेल, महिबुब सैफन फुलारी, वारीस पटेल, दिलावर मुलाणी, वसीम फुलारी, मुस्तफा खतीब, मुजम्मील मुलाणी, अमन मुलाणी, इरफान दावन्ना, शौकत खतीब, आरिफ भांगिरे,इरफान भाई फारूकी व सोलापूर जिल्ह्याचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सोलापूर