दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की, FOGSI (Federation of Obstetric and Gynaecological Societies of India) ची प्रेसिडेन्शियल कॉन्फरन्स यंदा सोलापूर येथे 19 व 20 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहे. या राष्ट्रीय पातळीवरील भव्य परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून प्रसिद्ध स्त्री-रोग व प्रसूतीतज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेची "Learn, Unlearn, Relearn" ही थीम असून वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या झपाटयाने बदलणा-या तंत्रज्ञानासोबत डॉक्टरांनी स्वताला सुसंगत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
विशेष कार्यक्रम: 1) शुक्रवार दि. 18 जुलै 2025 रोजी, दुपारी 3 वाजता, IMA हॉल येथे सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी (Cervical Cancer Screening) आणि HPV लस याबद्दल माहिती हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, महिलांच्या आरोग्यविषयक महत्वाच्या बाबींबद्दल जागरुकता वाढवणे हा उद्देश आहे.
2. कार्यशाळा -कोल्पोस्कोपी - गर्भाशयाच्या मुखाच्या आजारांची अचूक तपासणी करणारी आधुनिक पद्धत
कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी सौंदर्यात्मक स्त्री-रोगशास्त्रातील नवनवीन उपचारपद्धती
3. नवीन औषधे, शस्त्रक्रियेतील नवीन तंत्र, आणि रोबोटिक सर्जरीसंबंधी सत्रं वैद्यकीय क्षेत्रातील प्रगततम तंत्रज्ञानांची ओळख आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकया कॉन्फरन्सचे यजमानत्व सोलापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीने स्वीकारले असून, संपूर्ण शहरासाठी ही एक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पर्वणी ठरणार आहे. देशभरातील प्रसिद्ध स्त्री-रोग व प्रसूतीशास्त्र डॉक्टर्स तज्ञ म्हणून या कॉन्फरन्सला लाभणार आहेत.अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ.सुजाता कुलकर्णी यांनी दिले आहे या पत्रकार परिषदेस डॉ.प्रतिभा बलदवा डॉ.मोनिका उंबरदंड डॉ.माणिक गुर्रम डॉ.लता पाटील डॉ.रोहिणी देशपांडे डॉ.विजय पवार आदी उपस्थित होते.
Tags
सोलापूर