स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची दमदार कामगिरी १७ किलो "गांजासह "ओडीसा राज्यातील ०२ आरोपींना अटक

 


सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्हयातून " गांजा" चा पुरवठा होत असलेबाबत अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी माहिती प्राप्त करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सोलापूर जिल्ह्यात गांजा पुरवठा कोठून होतो, ते करणारे कोण इसम आहे याच्या मागावर होते.  त्यावरून दिनांक ३०.०८.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरज निंबाळकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, सोलापूर ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवरील कोरोली ब्रिजच्या खाली प्रतिबंधीत पदार्थ 'गांजा" हा छुप्या पध्दतीने विक्री करण्याकरीता दोन इसम येणार आहेत. त्यावरून पोनि संजय जगताप यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून अंमली पदार्थ "गांजा" याचेवर कारवाई करण्याकरीता पथकासह रवाना झाले.संजय जगताप, यांचे पथक सोलापूर ते कोल्हापूर रोडवरील कोरोली ब्रिजच्या खाली सापळा लावून थांबले असताना, प्राप्त गोपनीय माहिती प्रमाणे दोन इसम आपल्या हातामध्ये प्रत्येकी एक प्रवासी बॅग घेवून पुलाकडे चालत येत असल्याचे दिसून आल्याने त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांचे नावे १) सुरज प्रदीप नायक वय २१ वर्षे. २) विग्यानंद वालतेनो नायक, वय २१ वर्षे. दोघे रा. भालीपंका, ता. गुलवा, जि. गजपती, रा. ओडिसा असे असल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यातील प्रवासी बंगांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये १७ किलो ५६७ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच दोन मोबाईल फोन असा ३.७३.३४०/- रू किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे गु.र.न.२७३/२०२५, गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमचे कलम ८ (क) व २०(ब), ii (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा पुढील तपास श्री. सुरज निबांळकर, स्था.गु.शा हे करीत असून आरोपीची दि.०४/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर असुन पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण दिपक चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप, व. पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचेसह सपोनि भिमगोंडा पाटील, पोउपनि सुरज निंबाळकर, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, पोह सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, अनिस शेख, जयवंत सादुल, मपोहेकों अश्विनी गोटे, पोकों सागर ढोरेपाटील, प्रमोद शिंपाळे, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, संदिप हुलगे, मपोकों सुनंदा झळके, चापोकों राजेंद्र गवेकर, दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form