तक्रारीचा तथा दैनिक लोकशाही मतदार चा इम्पॅक्ट : "ते" अवैध रित्या टाकलेले राजकीय पक्षाचे अतिक्रमण (खोके) काढण्यात आले

 


सोलापूर (प्रतिनिधी)- | आपण पहातो की,सोलापूर शहरातील संपूर्ण फुटपाथचा दुरूपयोग होताना दिसतो.ह्या सर्व बाबी प्रशासन स्थानिक प्रशासन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो.पुटपाथ म्हणजे पादचाऱ्यांनी पायी चालण्याची जागा.परंतु सध्याच्या परिस्थितीत शहरातील जणुकाय दुकानदारांनी फुटपाथवर आपला कब्जा केला की काय असे चित्र सर्वत्रच दिसून येते.शहर भागात मुख्यतः विशेष महत्त्वाच्या ठिकाणी वाढते ट्राफीक,पार्किंगची समस्या आणि फुटपाथवर अवैध व्यवसाय यामुळे पायदळ घालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते व याचा परिणाम दुर्घटनेमध्ये होतो. फुटपाथवरुन चालु शकत नाही,कारण तिथे दुकाने/ हातगाड्या लागलेल्या असतात, वाढत्या ट्राफीकमुळे रस्त्यांनी मोठी गर्दी असते या सर्व अडचणींमध्ये पायदळ चालणारे आबालवृद्ध,विद्यार्थी व सर्वसामान्य अडकतात अशा परिस्थितीत सर्वांनाच घरी जाण्याची घाई असते.अशा कठीण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना सुध्दा ओढावू शकतात आणि अशा घटना झाल्या सुध्दा आहेत.अनेकदा पायदळ चालणाऱ्यांना मागून एखादे वाहन येते आणि दुर्घटना करून निघून जाते.यात दोषी कोण? पायदळ चालणारे म्हणावे की वाहन चालविणारे! माझ्यामते यात मुख्य दोषी म्हणजे स्थानिक प्रशासन कारण फुटपाथचा योग्य आणि सटीक उपयोग जर झाला तर आणि फुटपाथ पायदळ घालणाऱ्यांसाठी मोकळी केली तर पायदळ घालणाऱ्यांच्या ९५ टक्के दुर्घटना आपोआप थांबेल. प्रशासन / पोलीस प्रशासन (वाहतूक शाखा)वाहन चालकांचे लायसन्स , हेल्मेट, कागदपत्र विचारतात मग पायदळ घालणाऱ्यांना फुटपाथवर चालण्याचे का सांगत नाही!कारण फुटपाथवर व्यावसायिकांनी पुर्णपणे अतिक्रमण केले आहेत.त्यामुळे सरकारने, प्रशासनाने व स्थानिक प्रशासन पायदळ चालणाऱ्यांच्या वाढत्या दुर्घटना पहायला संपूर्ण नागरिकांसाठी राज्यातील संपूर्ण शहरातील फुटपाथ मोकळी केली पाहिजे,सरकारने व स्थानिक प्रशासनाने ताबडतोब अंकुश लावणे गरजेचे आहे.जेणेकरून सोलापूर शहरातील सर्वच फुटपाथ तथा पायदळ घालणाऱ्या सर्वांनाच मोकळीक मिळेल अशी आशा



 असताना आपले राजकीय वरदहस्त दाखवत शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नावाने केएलई शाळेच्या समोर फुटपाथ  लगत मोठे असे लोखंडी कार्यालयाचे खोके टाकले असून सदरील खोका हा सत्ताधारी पक्षाचा असल्याने महापालिका प्रशासन घाबरत आहे का ? असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित होतो , वेळेवर कारवाई न झाल्यास अतिक्रमण धारकांचे आणखी धाडस वाढून शहरभर अतिक्रमणाचे जाळे पसरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.आता राजकीय पक्षाचा जिल्हाप्रमुख अतिक्रमण बादशहा ठरणार की महापालिका प्रशासन कारवाई करून किंग ठरणार हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.अश्या राजकीय अतिक्रमणांमुळे महापालिका प्रशासन तथा संबंधित विभागाला अश्या सर्व गोष्टी आता आव्हानात्मकच ठरणार आहेत हे देखील तितकेच खरे.अश्या आशयाचे बातमी अक्षय बबलाद यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्रातून प्रसारित करून स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले होते आज तक्रारीचा तथा दैनिक लोकशाही मतदार च्या बातमीचा दणका बसला असून अवैध रित्या अतिक्रमण करू पाहणाऱ्या वरील नमूद राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचे भव्य लोखंडी खोके अतिक्रमण विभाग महानगर पालिका वतीने अक्षय बबलाद यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सदरील अतिक्रणधारकास नोटीस देऊन सदरील अवैध लोखंडी खोके काढण्यासाठी सूचना दिल्याने अतिक्रमणधारक सदरील खोके स्वतः काढून घेतले असून आज सदरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त झाले असून फुटपाथ ने आणि तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांनी आज सुटकेचा निःश्वास सोडला आहे.अश्याप्रकारचे अवैध रित्या कोणतेही सामाजिक संघटना तथा राजकीय पक्ष अतिक्रमण करत असतील तर कदापि बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे तक्रादार अक्षय बबलाद यांनी दैनिक लोकशाही मतदार ला सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form