सोलापूर (प्रतिनिधी)- उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातून चौघांनी शनिवारी पहाटे दोन टिप्पर पळवून नेले आहेत. त्यात आठ ब्रास मुरूम होता. या प्रकरणी चौघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.१८ ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास चौघेजण उत्तर तहसील कार्यालयातून वाहने नेली. शासकीय कारवाई टाळण्यासाठी मुरमाचे दोन टिप्पर घेऊन ते रातोरात पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. तेथील यशवंत रोकडे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रविकांत चौगुले (रा. तुळजापूर नाका, पृथ्वीराज चव्हाण (रा. गुळवंची), प्रेमा धर्मा राठोड व दिलीप ननवरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे उत्तर तहसील कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचा प्रत्यय आला असून तहसील कार्यालयाची अब्रू वेशीवर टांगत दोन टिप्पर पळव ल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटने चा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे करीत आहेत पोलिसांनी रविवार (ता.१९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन पंचनामा केला. पोलिस आता गुन्ह्याच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी सुरू केली आहे. यापूर्वी देखील या तहसील कार्यालयातून वाहन पळवून नेल्याचे प्रकार घडले आहेत.यामुळे कार्यालय प्रशासनावर संशयाचा प्रश्नचिन्ह आता निर्माण होताना दिसून येत आहे.
