सोलापूर (प्रतिनिधी)- देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा संविधान बचाव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आले होते. या संविधान बचाव मोर्चात मुस्लिम, भटके विमुक्त, बौद्ध आणि बहुजन समाजातील नागरिकांचा सहभागी झाले होते.संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण; विविधता असूनही देश एकसंध ठेवण्याचे श्रेय संविधानाला. संविधान संपविण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढण्यात आले.राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणुकीचा निषेधार्थ आरक्षणातील वर्गीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आले. संविधान बचाव मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे पोचल्यावर यावेळी पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचे पत्र नाना पक्षाने यांना देण्यात आले.
यावेळी आप्पासाहेब लंगोटे, युनूस अत्तार, लतीफ नदाफ,
डी.डी.पाढरे, गिरमल्ला गुरव,अस्लम नदाफ,सुरज राजपूत, मोहन थळंगे, अश्पाक शेख, साजीद मकानदार, रियाज हजगिकर यांच्यासह पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सोलापूर