आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात ; ६५ हजार विद्यार्थी लिहिणार पेपर


सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आज शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. पहिला पेपर मराठीचा असून ६४ हजार ४५४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावी परीक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या १८८ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी लोकमतशी बोलताना दिली.दरम्यान २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता १० वीची परीक्षा होणार आहे. इयत्ता १० वी साठी परीरक्षक केंद्र १५ असून एकूण १८८ परीक्षा केंद्रामधून ६४,४५४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय ७ भरारी पथक तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर ३ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व अतिसंवेदनशील व संवेदनशील केंद्रांची संवेदनशील केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post