डॉ.कीर्तिपाल गायकवाड अभिनीत "सत्यशोधक गाडगेबाबा क्रांतिनाट्याचा नागपुरात प्रयोग

दैनिक_लोकशाही_मतदार
 नागपूर -  प्रबुद्ध रंगभूमीचे जेष्ठ अभिनेते डॉ. कीर्तिपाल  गायकवाड लिखित व अभिनित 'मी  सत्यशोधक गाडगेबाबा बोलतोय' या एकपात्री क्रांतीनाट्याचा प्रयोग नागपुरातील जरीपटका भागातील नवयुवक तरुण मंडळ व हर्षवर्धन बुद्ध विहार समितीच्यावतीने दि०१७ व १८ शप्रिल रोजी दोन ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झाला.
1] अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ कीर्तिपाल गायकवाड हे तीन दिवस नागपुर दौऱ्यावर  आज इंदोरा येथील बुद्ध विहारात त्याचे  १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. बौद्धधम्मावर व्याख्यान झाले.  त्याची डॉ. गायकवाड यांनी भन्ते सुरेई ससाई यांची भेट घेऊन त्यांचाशी चर्चा केली. सायंकाल नझुल ले - आऊट येथील  प्रज्ञादीप या विहारात भाषणाचा कार्यक्रम झाला. तर 'बंदिनी बँकेच्या वतीने आयोजित. केलेल्या विशेष कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांनी भीमगीते सादर केली तर नवयुवक मंडळाच्या वतीने 6 डिसेंबरला विशेष देखावा सादर करण्यात आला होता. त्याची पाहणी करून तेथिल  बौद्ध बांधवास डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संकल्पनेतील प्रबुद्ध भारत या विषयावर  प्रवचनातून मार्गदर्शन केले. त्यानंतर 'सत्यशोधक गाडगेबाबा' हा नाट्यप्रयोग सादर केला.  त्यांच्या सोबत भंते  नागाप्रकाश , संजय सायरे  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form