महात्मा बसवेश्वरांना बसव प्रतिष्ठाणच्या वतीने अभिवादन...

दैनिक_लोकशाही_मतदार
मुरूम ता -  अक्षय तृतीया महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुरूम शहरातील बसव प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले. केसरजवळगा सोसायटी चेअरमन श्रीमंत भुरे, मुरूम नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे,मुरूम व्यापारी आप्पासाहेब बिराजदार, संजय धुमुरे,किरण गायकवाड,आनंद कांबळे, उत्कर्ष गायकवाड, देवराज संगुळगे,बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे आदींच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक एम जी शेंडगे पोलीस कर्मचारी सह अभिवादन केले. बसव प्रतिष्ठाणच्या वतीने दि.२२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त स्थापना आणि जागेवरच विसर्जन केले जाते, दि.१४ मे रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येनार आहे. जयंतीनिमित्त खंडप्पा धुम्मा, डिंगबर सोनटक्के, गोपाळ इंगोले, अविनाश चव्हाण, अशोक घोडके,पिंटू लोणी, शंकर सोलापूरे, उमेश पुराणे, अमित ढाले,अविनाश कांबळे सह बसव भक्त उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form