दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई- राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची व एक मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत सर्व मंत्र्यांची अतिशय तातडीचे बैठक बोलावली आहे. सर्व मंत्र्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत, सर्व कार्यक्रम किंवा दौर रद्द करुन तातडीने मुंबईला रवाना व्हा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांनी दिले आहेत, त्यामुळं तर्कवितर्क काढले जात असून, कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी एवढा तातडीने मंत्र्यांना मुंबईत बैठक बोलावली आहे. यावर चर्चा होत असून, पुन्हा काही राजकीय भूकंप किंवा सत्ताबदल होणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
बैठक कशासाठी बोलावली?
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य करत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळं राज्य सरकार पुन्हा याचिका दाखल करणार का? यावर या बैठकीत खलबतं होणार असून, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. मराठ समाजाला आऱक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळ आज तातडीचे बैठक बोलवण्यात आली आहे
Tags
मुंबई