दैनिक_लोकशाही_मतदार
जळगाव :- शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमधील पाचोऱ्यात रविवारी ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच राजकारण तापलं आहे.संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाही तर सभेत घुसणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याला आता ठाकरे गटाकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांच बक्षिस घेऊन जा, असं चॅलेंज ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. आता यावर गुलाबराव पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजकारण तापलं रविवारी पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेआधीच राजकारण तापलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून समाचार घेण्यात आला आहे. सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचं बक्षिस घेऊन जा असं प्रति आव्हान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून गुलाबराव पाटील यांना देण्यात आलं आहे.तसचं गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील? उद्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेवरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना डिवचले होते. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं, अन्यथा सभेत घूसनार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्या सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
