शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याच्या विधानाचा अर्थ काय? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

 


दै
निक_लोकशाही_मतदार

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. अखेर यावर आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी ही चर्चा ऐकतो आहे.जेव्हा होईल तेव्हा होईल, अजून कोर्टाचा निर्णय बाकी आहे. कोर्टाचा निर्णय लागल्यावर काय होईल ते बघू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी ते राज ठाकरे यांच्यावरही बोलले आहेत, जसं राज ठाकरे यांनी काकाकडे लक्ष ठेवलं, तसंच मीही काकाकडे लक्ष ठेवतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांवर प्रतिक्रिया दरम्यान मुंबईमधील एका कार्यक्रमात तव्यावरची भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे.

भाकरी फिरवली नाही तर ती करपते, विलंब करून चालणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात नवीन चेहेर असले पाहिजेत, तरुणांना संधी मिळाली पाहिजे या हेतूनं पवार साहेब बोलले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांवर प्रतिक्रिया जंयत पाटील हे देखील राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. याबाबतअजित पवार यांना विचारले असता त्यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा म्हणत दोन शब्दात विषय संपवला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form