दैनिक_लोकशाही_मतदार
मंगळवेढा | प्रतिनिधी - मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य हिरा पानमसाला गुटखा वाहतुक करणा-या मालवाहतुक ट्रकसह ४२००८००/-रु. किंमतीचा गुटखा पकडला दिनांक १७/०४/२०२३ रोजी मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने , यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून मौजे निपानी (कर्नाटक राज्य) येथुन एक मालवाहतुक ट्रक नंबर एम एच १२ एच.डी. ७८७६ मधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला हिरा पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखु अवैध्य रित्या सांगोला मार्गे सोलापुरचे दिशेने जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहीती
मिळाल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने साो, व सपोनि / भुजबळ, परि पोसई धापटे सो. पोहेकॉ / दयानंद हेबांडे, पोहकों/ दत्तात्रय यलपले, पोना / सुनिल मोरे, पोकों/वैभव घायाळ यांना सोबत घेवुन मौजे मंगळवेढा शहराचे जवळ सांगोला नाक्यावर सोलापुर हायवे रोडचे कडेला नाकाबंदी करून संशयीत वाहन थांबवुन चौकशी करीत असताना पहाटे ०३:०० वाचे सुमारास एम एच १२ एच.डी. ७८७६ या मालवाहतुक ट्रक ही तेथे आल्याने आम्ही तीस थांबण्याचा इशारा करून थांबवुन सदर मालवाहतुक ट्रक चालकास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर असे असल्याचे सांगीतले.सदर माल वाहतुक गाडीत पाठीमागील बाजुस ताडपत्री बांधलेली सोडुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता पाटीमागील बाजुस पांढरे रंगाची पोती दिसत होती. सदर पोत्यात काय आहे याबाबत चालकास विचारणा केली असता त्याने सांगीतले की, सदर पांढरे रंगाचे पोत्यात पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखु आहे असे सांगीतल्याने आम्ही सदर ट्रक चालकास घेवुन मंगळवेढा पोलीस ठाणेस आणुन ट्रक मधील पोती बाहेर काढुन पाहिले असता त्यामध्ये खालील नमुद वर्णनाचा माल मिळून आलाएकुण ३१००८००/- व ट्रक क्रमांक एम एच १२ एच.डी. ७८७६ या वाहनाचे अंदाजे किंमत ११००००० /- रू. असे एकुण एकत्रीत किंमत ४२,००८००/-रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणेकामी मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापुर यांना सदर वाहनातील गुटखा जन्यपदार्थ व ट्रक चालक यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. सदर वाहन चालकाकडे वाहन मालका बाबत चौकशी केली असता वाहन मालक हा सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर व वाहतुकदार जबीउल्ला सयद उर्फ रोशन यांच्या मार्फत निपाणी, कर्नाटक येथुन करीत असल्याबाबत सांगीतले आहे. त्यानंतर मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापुर यांच्या पथकाने मंगळवेढा पोलीस ठाणेस येवुन सदरचा मुद्देमाल व इसम यांना त्याचे ताब्यात दिले.येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहन, वाहन चालक मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल पंचनामा करून मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापुर यांनी सदर मुद्देमालाचा पंचनामा करून इसम नामे १) राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर २) सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर ३) जबीउल्ला सयद उर्फ रोशन ४) रफिक उर्फ रसुल मेनन रा. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांचे विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i) व २६ (२) (ii),२६ (२) (iv), सह वाचन कलम २७ (३) (E), ३० (२) (a) शिक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / येलपले हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम, मंगळवेढा विभाग, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि / प्रकाश भुजबळ, परि. पोसई / धापटे साहेब, पोहेकॉ / दयानंद हॅबाडे, पोहेकॉ / दत्तात्रय येलपले, पोना / सुनिल मोरे, पोना/ तलवार, पोकॉ/ वैभव घायाळ, पोकॉ/ युवराज वाघमारे यांनी केली आहे.
