दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर | प्रतिनिधी - जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती, असा आरोप केला आहे.ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यावर भाजपा गप्प का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर काँग्रेस च्यावतीने निदर्शने करण्यात आले.
यादरम्यान "जवाब दो मोदी , जवाब दो" च्या घोषणाबाजी देत जिल्हापरिषद परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी ' जवानांची बळी देऊन राजकीय फायदा घेणाऱ्या मोदी सरकार चा निषेध असो' " शर्म करो मोदी , शर्म करो " अश्या आशयाचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आले यावेळी काँग्रेसचे विनोद भोसले चेतन नरोटेसह इतर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सोलापूर