मंद्रुपचे कार्यसम्राट डॅशिंग अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी स्वीकारला प्रभारी दक्षिण तहसीलदार चा कार्यभार

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर |  प्रतिनिधी -

दक्षिण सोलापूर- प्रभारी जिल्हाधिकारी मा. तुषार ठोंबरे यांनी आदेश काढून तहसिल दक्षिण सोलापूरचे प्रभारी तहसिलदार या पदाचे कार्यभार मंद्रुपचे कार्यसम्राट डॅशिंग अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे ज्यांनी आजपर्यंत मंद्रूप तहसीलदार कार्यालय येथे तळमळीने गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले असून आता प्रभारी दक्षिण तहसीलदार पदाचा कार्यभार लिंबारे यांना देण्यात आले आहे.

राजशेखर लिंबारे यांनी दिनांक ११ मे २०२३ रोजी कार्यभार स्विकारुन त्वरीत संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून शनिवार व रविवार दोन सुटटीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून विशेष सहाय्य योजनेंतर्गत येणा-या संजय गांधी, श्रावणबाळ, राष्ट्रीय वृध्दापकाळ व विधवा या प्रकरणातील सर्व कागदपत्राचे तपासणी करुन पात्र/अपात्र



 लाभार्थ्यांचे यादी करणेबाबत सुचना दिले त्यानंतर त्वरीत सोमवार दिनांक १५/५/२०२३ रोजी संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक घेवून संजय गांधी निराधार योजनेचे ७३ लाभार्थी, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेचे १०७, राष्ट्रीय विधवा योजनेचे २०, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेचे २८ असे एकुण २२८ पात्र लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची ७ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहेत. सदर संजय गांधी योजना बैठकीस संगायो नायब तहसिलदार आरती दाबडे, अव्वल कारकुन परवीन रंगरेज, महसूल सहाय्यक कुलकर्णी एस.एल तसेच आय टी असिस्टंट श्रेयश देशपांडे हे उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form