मोनिका सरकार पवार यांच्यावर आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदाची धुरा

सोलापूर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील मोनिका सरकार पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचा विस्तार करताना महिला शक्तीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशात तसेच सोलापूर शहरात संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महिला आघाडी अधिक सक्षम करून महिलांना पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मोनिका सरकार पवार यांच्यावर महिला आघाडी अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मोनिका सरकार पवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रकाशची जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक सागर पाटील तसेच सोलापूर शहराध्यक्ष निलेश संगेपान यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे सोलापूर शहरातील आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, त्यांना संघटित करणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोनिका सरकार पवार सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
मोनिका सरकार पवार यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहरातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post