पैगंबर जयंतीनिमित्त ब्रिलियंट ग्रुपकडून सय्यद बुखारी दर्ग्यास पाण्याच्या टाकीची भेट

सोलापूर (प्रतिनिधी)- पैगंबर जयंतीनिमित्त ब्रिलियंट ग्रुपच्या वतीने विजापूर रोडवरील प्रसिद्ध सय्यद बुखारी दर्गा येथे भाविकांसाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी पाण्याच्या टाकीचे विधिवत पूजन करून ती भाविकांच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आली. सय्यद बुखारी दर्गा येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ब्रिलियंट ग्रुपने हा स्तुत्य सेवाभावी उपक्रम हाती घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.या कार्यक्रमास दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, ब्रिलियंट ग्रुपचे अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर, उद्योजक सचिन अक्कलकोटे, मुस्ताक लालकोट, सुहास जोशी तसेच दर्गा ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ब्रिलियंट ग्रुपच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व स्तुती होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post