सुरसंगम ग्रुपचा सातवा वर्धापन दिन उत्साहात पार्श्वगायिका सोलापूरची कन्या सुप्रिया सोरटे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

 


दैनिक_लोकशाही_मतदार

मंगळवेढा(प्रतिनिधी) - येथील सुरसंगम ग्रुपचा सातवा वर्धापन दिन हॉटेल सुगरण लॉन्स येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.

वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील पार्श्वगायिका सुप्रिया सोरटे यांना इनरव्हिल क्लबच्या लिना विग यांच्या हस्ते राज्य स्तरीय संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.सा.प.दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे होते.

व्यासपीठावर संमोहनतज्ञ डॉ.रविंद्र सोरटे,डॉ.अलका सोरटे,मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,माजी नगरसेवक प्रविण खवतोडे,इनरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा प्रफुल्लता स्वामी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुरसंगम परिवारातील प्रकाश जडे,लहू ढगे,निशिकांत प्रचंडराव,डॉ.दत्ता सरगर,गोरक्ष जाधव,गणेश यादव,संतोष मिसाळ,शुभदा जोशी,विद्या माने,संगीता इंगोले आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी निशिकांत प्रचंडराव यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी सूरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांचे हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.



सदरप्रसंगी डॉ.रविंद्र सोरटे यांनी आपल्या हिप्नॉटिझम कार्यक्रमाव्दारे उपस्थितांना खुर्चीला खिळवून ठेवले.या कार्यक्रमात त्यांनी हिप्नॉटिझमच्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन आणि या शास्त्राद्वारे मानसिक आणि मनो शारीरिक आजार कसे दूर होते याचे प्रात्यक्षिकही सादर केले. सदर प्रसंगी सुप्रिया सोरटे व सुरसंगमच्या सदस्यांनी विविध गीते सादर केली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्रकुमार जाधव,सुत्रसंचालन संतोष मिसाळ तर आभार प्रदर्शन भारत दत्तू यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,लहू ढगे,संतोष ढावरे,नवनाथ सावळे,निशिकांत प्रचंडराव,गणेश यादव,अनिल गायकवाड,अजय सरवदे,दत्तात्रय इंगोले, हर्षवर्धन चव्हाण,सुमित ढावरे,संगीता इंगोले,अल्फिया मुलाणी आदीनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form